Soybean Market Update: सध्या वायदे बाजारात सोयाबीनचे फक्त फेब्रुवारीचे वायदे सुरू आहेत. येत्या 18 तारखेला त्यातले व्यवहारही थांबतील. सध्या या वायद्यांचे भाव आणि स्थिती काय आहे, वाचा सविस्तर…
1. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार (varying temperature) सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवलीय. तर येते पाच दिवस राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं (dry weather) राहण्याचा अंदाज आहे.
2. जुलै 2022 ते जून 2023 या वर्षात कडधान्यांची देशांतर्गत गरज (pulses demand) भागवायची असेल, तर आपल्याला 300 लाख टन कडधान्य उत्पादन (pulses production) करावं लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्रालयाचे (agriculture ministry) आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी केलंय. दहा फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मल्होत्रा बोलत होते. चालू कडधान्य वर्षात आपल्याला 260 लाख टन कडधान्यांची गरज होती. त्यात आता भर पडेल, असंही मल्होत्रा यावेळी म्हणालेत.
3. मलेशियाच्या पाम तेल बोर्डानुसार (Malaysia palm oil board) जानेवारीत त्या देशाचं पाम तेल उत्पादन साडे 13 टक्क्यांनी घसरलंय. जानेवारी महिन्यात मलेशियात 13 लाख टन पाम तेलाचं उत्पादन झालं होतं. उत्पादनासोबतच जानेवारीत पाम तेलाची निर्यातही (palm oil export) 19 टक्क्यांनी घटल्याचं बोर्डाच्या माहितीवरून स्पष्ट होतं. याच काळात मलेशियातून बायोडिझेलच्या निर्यातीत 91 टक्क्यांची प्रचंड वाढ झालीय. या काळात मलेशियातून 23 हजार टन बायोडिझेल (biodiesel) निर्यात झालीय. तर आता मलेशियात पाम तेलाचा साठा 4 टक्क्यांनी घटल्याचंही कळतंय. जानेवारीच्या शेवटपर्यंत देशात 16 लाख टन पामतेल शिल्लक होतं. मलेशियानं पामतेल निर्यातीच्या ऐवजी देशांतर्गत बायोडिझेल उत्पादनाला प्राधान्य दिलंय.
4. शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती देणारी कृषिक प्रदर्शनं राज्यातल्या प्रत्येक महसूल विभागात आयोजित केली जातील, त्याचं नियोजन कृषी विभाग करणार असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे (agriculture minister) यांनी दिली. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषिक 2011 कृषी तंत्रज्ञान सप्ताहातल्या प्रदर्शनाची आज भुसे यांनी पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5. आज सोयाबीनच्या फेब्रुवारीच्या वायद्यांमध्ये (soybean February contracts) कोणताही बदल न होता बाजार 6650 वर बंद झाला. ब्राझीलमधलं सोयाबीन उत्पादन दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खालावण्याची दाट चिन्हं आहेत. परिणामी, दरांना आधार मिळत राहील, असं जाणकारांचं मत आहे. ब्राझील हा जगातला सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन (SOPA) दिलेल्या माहितीनुसार देशभरातल्या बाजारांमध्ये (spot markets) जानेवारीत 8 लाख टन सोयाबीनची आवक झालीय. तर गेल्या वर्षीच्या जानेवारीत हाच आकडा 12 लाख टनांवर होता. जानेवारी अखेर मिलर (millers), व्यापारी (traders), आणि शेतकरी यांच्याकडे मिळून 84 लाख टनांचा साठा उपलब्ध होता, असंही सोपाची आकडेवारी सांगते. सोयाबीनच्या उत्पादनाची शाश्वती नसल्यानं सोयातेलाचे भावही कायम राहतील, असा बाजारातल्या सुत्रांचा अंदाज आहे. तर मोहरी आणि पामतेलाचे वाढते भावही सोयाबीनच्या पथ्यावर पडत असल्याचं चित्र आहे. तर सोयाबीनची बेंचमार्क बाजारपेठ असलेल्या लातूरमध्ये आज आवक मालाला कमाल 6461 रुपयांचा भाव मिळालाय.
हे पण वाचा –
- चवळी शेंग बाजार भाव ३० जानेवारी २०२३
- तांदूळ बाजार भाव २८ जानेवारी २०२३
- चिकू बाजार भाव ३० जानेवारी २०२३
- ढोबळी मिरची बाजार भाव ३० जानेवारी २०२३
- मुळा बाजार भाव ३० जानेवारी २०२३