कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. कापसाच्या (Cotton) दरात 500 ते 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात कापूस दरात एक ते दीड हजार रुपयांची घसरण झाली होती.
कापसाच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरात 500 ते 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, शेतकरी आणखी दर वाढण्याची प्रतिक्षा करत करत आहेत.
मागील आठवड्यात कापूस दरात एक ते दीड हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळं राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत होते.
गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत होते. कापूस दरात दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली होती. दर कमी झाल्यानं कापसाची विक्री ही 7 हजार 500 पर्यंत खाली आल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठं निराशेचं वातावरण पसरलं होतं.
जागतिक पातळीवर कापूस दरात घट झाल्याने हे दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र,आज पुन्हा कापूस दरात प्रतिक्विंटल पाचशे ते हजार रुपयांची वाढ झाल्याने हे दर 8 हजार ते 8 हजार 500 असे झाले आहेत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर कापूस दरात वाढ झाल्यानं हे दर वाढले असल्याचं सांगितले जात आहे.
जळगावमध्ये कापसाच्या दरात 500 ते हजार रुपयांची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जळगाव बाजारपेठेत कापसाच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळं काही प्रमाणात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आणखी कापसाच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.