Onion Rate : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Onion Grower Farmer) एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो कांद्याच्या दरात (Onion Market Price) आज वाढ बघायला मिळाली आहे.
मात्र कांद्याच्या दरात ही वाढ फसवी असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. मित्रांनो आज सोलापूर एपीएमसीमध्ये (Solapur Apmc) पांढऱ्या कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.
मात्र त्याचं एपीएमसीमध्ये कांद्याला अवघा 1200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. यामुळे कांदा मध्ये झालेली ही वाढ फसवी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला असता कांद्याच्या दरात अजूनही अपेक्षित अशी वाढ पाहायला मिळत नाही. राज्यातील जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठशे रुपये प्रतिक्विंटल ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल एवढाचं सर्वसाधारण बाजारभाव (Onion Bazar Bhav) कांद्याला मिळत आहे.
अशा परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी बांधव सध्या मिळत असलेल्या बाजार भाव कांदा पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्किल असल्याचे नमूद करत आहेत. मित्रांनो आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पिकाला मिळालेल्या बाजारभावाविषयी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
तुमच्या बाजारसमितीचे आजचे ताजे दर पाहण्यासाठी खालील बटणवर टच करा